शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

महाराष्ट्र केसरीची समीकरणे भाग्यक्रमांक सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:22 AM

प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले. वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला पदकाला गवसणी घालण्यासाठी डावांच्या अस्त्रांबरोबरच भाग्यक्रमांकाचे ब्रह्मास्त्रही मोलाचे ठरते.

प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले.वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला पदकाला गवसणी घालण्यासाठी डावांच्या अस्त्रांबरोबरच भाग्यक्रमांकाचे ब्रह्मास्त्रही मोलाचे ठरते.महाभारतात कर्णाने अनेक विद्या हस्तगत केल्या; परंतु प्रत्येक वेळी त्याला विद्येबरोबर शापही मिळाले. किती विचित्र योगायोग होता.अगदी तसाच योगायोग आज महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकात दिसून आला. गतवर्षीच उप महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि पुणे जिल्ह्याचा महाबली शिवराज राक्षे याच भाग्य क्रमांकामुळे पहिल्याच फेरीत लढणार आहेत.एवढेच नव्हे तर लगेच दुसºया फेरीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्या फेरीत विजयी झाल्यानंतर दुसºया फेरीत अभिजित आणि शिवराज यांच्यातील विजेत्यांशी लढणार म्हणजेच महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार एकमेकांबरोबर पहिल्या, दुसºया फेरीतच लढणार आहेत. अगदी दोन्ही पोलमध्ये हीच परिस्थिती विक्रांत जाधव विरुद्ध सागर विराजदार ही लढतदेखील पहिल्याच फेरीत!हीच परिस्थिती माती विभागात दिसून येते. ज्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाते, ते किरण भगत आणि ज्ञानेश्वर जमदाडे दुसºयाच फेरीत लढणार आहेत. एकूणच भाग्यक्रमांकाने महाराष्ट्र केसरी किताबाला पहिल्या फेरीपासूनच उत्कंठावर्धक परिस्थिती निर्माण केली आहे.जणू काही महाराष्ट्र केसरीचे गादी व माती विभागाचे प्रबळ दावेदार उद्याच निश्चित करायचे आहेत की काय?फक्त मुळशी तालुकाच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींच्या चर्चेत हाच विषय आहे.कार्तिकी, आषाढीला वारकºयांच्या दिंड्या जशा आळंदी, पंढरपूरकडे निघतात, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांची पावले भूगावकडे भल्या सकाळीच निघणार आहेत. उद्याच्या अविस्मरणीय दिवसात कुस्तीशौकिनांना मिळणारा कुस्ती नजराणा नक्कीच अनोखा असेल!-दिनेश गुंडआंतरराष्ट्रीय कुस्ती पंच