शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 06:06 IST

अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला.

महेश पाळणेधाराशिव : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील लढती जसजशा पुढे जात आहेत तसतशी चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. गादी गटातून नांदेडच्या शिवराज राक्षे व मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने अंंतिम फेरी गाठली आहे. माती विभागातून हिंगोलीचा गणेश जगताप आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी अंतिम फेरीत धडक दिली. सोमवारी दोन्ही गटांच्या अंतिम लढती रंगणार आहेत.

गादी विभागातील उपांत्य सामन्यात नांदेडच्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने कोल्हापूरच्या संग्राम पाटीलचा एकतर्फी धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा  ५-० असा एकेरी पराभव करीत फायनलची जागा पक्की केली आहे. तत्पूर्वी, माती विभागात नांदेडच्या शिवराज राक्षेने मुंबईच्या सारंग सोनटक्केचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरच्या संग्राम पाटीलने बुलढाण्याच्या बाला रफीक शेखचा ११-६ असा धुव्वा उडविला. पुण्याच्या हर्षद कोकाटेने मुंबईच्या वैभव रासकरला चितपट करीत विजय मिळविला. मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने पुण्याच्या तुषार दुबेचा ७-० असा सरळ पराभव केला. माती विभागात हिंगोलीच्या गणेश जगतापने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसलेचा ६-० ने एकतर्फी पराभव केला.  

अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पुण्याच्या साकेत यादवचा चितपट करीत धुव्वा उडविला.

सदगीर-जगताप मातीतून फायनलमध्येहिंगोलीच्या गणेश जगतापने अवघ्या एका मिनिटात लपेट डावावर अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेला उपांत्य फेरीत चितपट करीत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सामन्यात नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ६-१ असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये हर्षवर्धनने एकेरी पट काढून महेंद्रला बाहेर काढत एक गुणाची कमाई केली. त्यानंतर खेमे धरून पाठीवर घेत २ गुण कमावले. ६-१ असा स्कोअर होताच महेंद्र गायकवाडने कुस्ती सोडून दिली त्यामुळे हर्षदला विजयी घोषित करण्यात आले. 

स्काॅर्पिओ, ट्रॅक्टर मैदानातमुख्य विजेत्या मल्लाला स्काॅर्पिओ देण्यात येणार असून, उपविजेत्या मल्लाला ट्रॅक्टर तर इतर वजनी गटातील विजेत्या व उपविजेत्या मल्लांना अनुक्रमे बुलेट व शाईन गाडी देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती