शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे झाले राष्ट्रीय कुस्तीचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:13 IST

‘महाराष्ट्रातील मल्लांमध्ये ऑलिंपिक गाजवण्याची क्षमता आहे. मात्र येथील मल्ल अल्पसंतुष्ट आहेत.

- प्रमोद आहेरशिर्डी : ‘महाराष्ट्रातील मल्लांमध्ये ऑलिंपिक गाजवण्याची क्षमता आहे. मात्र येथील मल्ल अल्पसंतुष्ट आहेत. त्यांना महाराष्ट्र केसरी व त्यातून सरकारी नोकरी मिळाली की ते येथेच थांबतात. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्र केसरीमुळे राष्ट्रीय कुस्तीचे मोठे नुकसान होत आहे,’ अशी खंत राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व खासदार बृजभुषण शरणसिंग यांनी व्यक्त केली. ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेच्या निमित्ताने शरणसिंग गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.शरणसिंग म्हणाले, ‘पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आॅलिंपिकसाठी चार मल्ल पात्र झाले असून दुस-या फेरीनंतर ही संख्या दहावर पोहचेल. आम्ही नक्कीच सुवर्ण पदक मिळवू. कुस्ती हा नैसर्गिक खेळ आहे. फ्री स्टाईल कुस्तीचा जन्म भारतात झाला. क्रिकेट केवळ आठ देशात खेळला जातो. कुस्ती १३० देशात खेळली जात आहे. सध्या देशात कुस्तीमध्ये हरियाणा पहिल्या क्रमांकावर असून अंदमान निकोबार व पूर्वेकडील अरुणाचल, सिक्कीमसारख्या काही राज्यात कुस्तीचा प्रसार झाला नाही.’‘क्रिकेटनंतर रँकिंगवर खेळणारा कुस्ती हा पहिला खेळ आहे़ क्रमवारीनुसार मल्लांना जास्तीतजास्त वार्षिक तीन लाख ते तीस लाख रुपये मदत दिली जाते़ देशातील शंभर खेळाडूंवर दरवर्षी पाच कोटी रूपये खर्च केले जातात़ बजरंग पुनीयाला वर्षाला तीस लाख, दिनेशला पंचवीस, साक्षी मलिक व सुशीलला प्रत्येकी २० लाख रुपये दरवर्षी डाएट व प्रशिक्षणासाठी दिले जात आहे,’ असेही शरणसिंग यांनी यावेळी सांगितले.खाशाबा जाधव यांच्यासाठी निवेदनभारताचे पहिले आॅलिम्पिक पदक विजेते कुस्तीगीर दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राहाता तालुका कुस्ती तालीम संघाकडून करण्यात आली. यासाठी संघाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभुषण शरणसिंग यांच्याकडे निवेदन दिले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्र