शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

CWG 2022:संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 13:54 IST

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले.

मुंबई: इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील संकेत सरगरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. संकेतवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आता महाराष्ट्र सरकारने त्याला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून संकेत सरगरला ३० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच संकेतचे प्रशिक्षक यांना देखील ७.५० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. 

मराठमोळ्या संकेतचा डंका शनिवारी मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने रौप्य पदक जिंकून भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. संकेतने मिळवलेल्या या पदकापूर्वी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम संख्या ठरली आहे. शेवटच्या प्रयत्नापर्यंत संकेत आघाडीवर होता मात्र त्याच्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्याला १३९ वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले आणि संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले. 

सांगलीच्या सुपुत्राने रचला इतिहासमराठमोळा २१ वर्षीय संकेत २०२० मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा चॅम्पियन राहिला आहे. त्याच्या नावावर ५५ किलो वर्गात (स्नॅच १०८ किलो, क्लीन अँड जर्क (१३९ किलो) राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. संकेत सरगरची ऑक्टोबर महिन्यात NIS पटियाला येथे प्रशिक्षण घेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. संकेतला वेटलिफ्टिंगची मजबूत वारसा लाभलेला आहे, २१ वर्षीय संकेत हा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. तो खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० चा चॅम्पियन होता. विशेष म्हणजे या आठवड्यात तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देखील पदार्पण करणार आहे.

संघर्षमय कहाणीसंकेतचे वडील महादेव सरगर हे १९९० च्या कालावधीत सुरुवातीला ग्रामीण भागातून सांगलीत आले होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी प्रथम पान शॉप, संकेत पान आणि नंतर त्याच्या शेजारी चहा आणि नाश्त्याचा स्टॉल उघडण्यासाठी एका गाडीतून फळे देखील विकण्याचा छोटा व्यवसाय केला. संकेत म्हणतो की, त्याने खेळ सुरू केल्यानंतर काही वर्षांनी त्याने या खेळाला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरूवात केली. "सुरूवातीच्या पहिल्या दोन वर्षी मला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची देखील माहिती नव्हते त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा मी विचारही करत नव्हतो. मला जिल्हा पातळीवरील स्पर्धांची तयारी कशी करावी हे आव्हान सतावत होते. मी त्याच्यासाठी खास प्रशिक्षम न घेता माझे प्रयत्न चालू ठेवले. मी इयत्ता ९ वीत जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता आणि तेव्हा कोणतेही प्रशिक्षण न घेता मी आज रौप्य जिंकले आहे", असे संकेतने विजयानंतर सांगितले. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाMaharashtraमहाराष्ट्रSilverचांदीEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारChief Ministerमुख्यमंत्रीSangliसांगली