पंजाब : पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारचा दिवस गाजवला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 8 मिनिटे 28.94 सेकंदाच्या वेळेची नोंद करताना स्वतःच्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेची पात्रता निश्चित केली. त्याच्यासह 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सन, अजय कुमार सरोज आणि राहुल यांनी आशियाई स्पर्धेचे तिकीट पटकावले.
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम, आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 18:16 IST