शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महादेव वडारने वाढवलं महाराष्ट्राचं 'वजन'; वेटलिफ्टिंगमध्ये ६७ किलो गटात जिंकलं सुवर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 21:39 IST

महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत टेबल टॉपर महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले.

चेन्नई: वेटलिफ्टर महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत टेबल टॉपर महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. पदकतालिकेतील यजमान तामिळनाडूविरुद्धची आघाडी महाराष्ट्राने आणखी मजबूत केली. 

सकाळच्या सत्रात नेमबाजी, वेटलिफ्टिंग आणि सायकलिंगमधून प्रत्येकी दोन सुवर्णपदकांपैकी महाराष्ट्राला किमान तीन सुवर्ण जिंकता आली असली. पण, अखेरीस वेटलिफ्टिंगमधून फक्त एक सुवर्ण, एक रौप्य आणि २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवण्यात यश आले. महाराष्ट्राच्या पदकांची संख्या २९ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३१ कांस्य अशी आहे.

वडारला फक्त एका क्लीन लिफ्टसह स्नॅच (११३ किलो) आणि क्लीन अँड जर्क (१४० किलो) मध्ये एकूण २५३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तामिळनाडूच्या पी आकाशला ११ किलो फरकाने रौप्यपदकावर समाधानी रहावे लागले, तर ओडिशाच्या दीपक प्रधानने कांस्यपदक पटकावले. अंकुश लोखंडेने जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या ६१ किलो गटात एकूण २३७ किलो वजन उचलून रौप्यपदकाची भर घातली. ओडिशाच्या सदानंद बरीहाने त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पाच किलो जास्त वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

तत्पूर्वी, केरळच्या सायकलपटू अलानिस लिली क्युबेलिओने मुलींच्या ६० किमी वैयक्तिक रोड शर्यतीत विजेतेपद पटकावले, तर चंदीगडच्या जय डोग्राने ईसीआरमध्ये ३० किमी टाइम ट्रायलमध्ये मुलांमध्ये अव्वल स्थान पटकावले. 

गुरु नानक कॉलेज शूटिंग रेंजमध्ये पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालच्या अश्मित चॅटर्जीने १० मीटर एअर रायफलमध्ये २५०.९ च्या अंतिम स्कोअरसह सुवर्णपदक जिंकले आणि हरियाणाच्या हिमांशूने (२५०.६) आणि राजस्थानच्या मानवेंद्र सिंग शेखवंतने (२२७.६) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात तेलंगणाच्या के तनिष्क मुरलीधर नायडूने १९ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. आंध्र प्रदेशच्या मुखेश निलावल्ली (१८) आणि महाराष्ट्राच्या स्वराज भोंडवे (१६) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. पदकतालिका  https://youth.kheloindia.gov.in/medal-tally

निकालसायकलिंग रोड मुली ६० किमी वैयक्तिक - सुवर्ण - अलानिस लिली क्युबेलिओ ( केरळ) ०१:५७:०४.६४०; रौप्य - संतोषी ओराओन ( झारखंड ) ०१:५७:०४.९५०; कांस्य - जे श्रीमती ( तामिळनाडू ) ०२:०९:५७.९३०

मुले२० किमी टाईम ट्रायल - सुवर्ण - जय डोग्रा ( चंदीगड) ४१:०९.५५०; रौर्य - खेता राम चिगा ( राजस्थान) ४१:२५.०७२; कांस्य - अक्षर त्यागी ( दिल्ली) ४१:२९.९०४ 

नेमबाजी  मुले १० मीटर एअर रायफल: सुवर्ण– अश्मित चॅटर्जी ( पश्चिम बंगाल) २५०.९; रौप्य - हिमांशू ( हरयाणा)  २५०.६; कांस्य – मानवेंद्र सिंग शेखावत (राजस्थान ) २२७.६ २५ मीटर रॅपिड फायर: सुवर्ण– के तनिष्क मुरलीधर नायडू ( तेलंगणा) १९; रौप्य - मुकेश निलावल्ली ( आंध्रप्रदेश) १८; कांस्य – स्वराज भोंडवे ( महाराष्ट्र ) १६ 

व्हॉलिबॉल ( उपांत्य फेरी) मुली - पश्चिम बंगाल वि. वि. गुजरात २५-११, ३०-२८, २५-१९मुले - हरयाणा वि. उत्तर प्रदेश २५-२२, २५-१७, २५-१८ 

वेटलिफ्टिंगमुले 

  • ६१ किलो: सुवर्ण- सदानंद बारिहा (ओडीशा) २४२ किलो; रौप्य – अनुष लोखंडे ( महाराष्ट्र ) २३७ किलो; कांस्य - रिकी गोगोई ( आसाम) २३५ किलो
  • ६७ किलो: सुवर्ण– महादेव वडार ( महाराष्ट्र ) २५३; रौप्य - पी आकाश ( तामिळनाडू ) २४२; कांस्य – दीपक कुमार प्रधान (ओडीशा) २४२
टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंगMaharashtraमहाराष्ट्रChennaiचेन्नई