मंदारची शानदार आगेकूच
By Admin | Updated: August 15, 2015 23:45 IST2015-08-15T23:45:24+5:302015-08-15T23:45:24+5:30
मंदार चिपळूणकरने पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात योहान मेहताचा ३-२ असा पराभव करुन आॅल मुंबई टेबल टेनिस स्पर्धेच्या सब ज्युनियर गटातून आगेकूच केली.

मंदारची शानदार आगेकूच
मुंबई : मंदार चिपळूणकरने पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात योहान मेहताचा ३-२ असा पराभव करुन आॅल मुंबई टेबल टेनिस स्पर्धेच्या सब ज्युनियर गटातून आगेकूच केली. त्याचवेळी मुलांच्या मिडगेट गटात तृतीय मानांकीत विवान मोहिले व चौथ्या मानांकीत कल्पक राऊत यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
मुलांच्या सब ज्यु. गटात मंदारने योहानला ४-११, ११-७, ५-११, १४-१२, ११-२ असे नमवले. कसलेल्या अथर्व कुराडेने देखील पिछाडीवरुन बाजी मारत क्रिश कलरानीला ३-२ असे नमवले. मिडगेट गटात विवानला कुशल पटेल विरुध्द ३-० असा पराभव पत्करावा लागला. तर यश तोडीने कसलेल्या कल्पकला धक्का दिला.