ल्यूज खेळाडू केशवनने घेतली निवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:05 IST2018-02-12T00:05:44+5:302018-02-12T00:05:52+5:30

हिवाळी खेळांमध्ये ब-याच काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू शिवा केशवन याने प्योंगचोंग हिवाळी आॅलिम्पिकनंतर पुरुष ल्यूज एकेरी स्पर्धेत ३४ व्या स्थानावर राहिल्यानंतर दोन दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली आहे.

 Luge player Keshavan took retirement | ल्यूज खेळाडू केशवनने घेतली निवृत्ती

ल्यूज खेळाडू केशवनने घेतली निवृत्ती

प्योंगचोंग : हिवाळी खेळांमध्ये ब-याच काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू शिवा केशवन याने प्योंगचोंग हिवाळी आॅलिम्पिकनंतर पुरुष ल्यूज एकेरी स्पर्धेत ३४ व्या स्थानावर राहिल्यानंतर दोन दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली आहे.
आपल्या सहाव्या आणि अखेरच्या हिवाळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या ३६ वर्षांच्या केशवन याने आॅलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. आॅलिम्पिक स्लाईडिंग सेंटरमध्ये तिस-या राऊंडमध्ये हिटमध्ये १३४४ मीटरच्या ट्रॅकला ४८.९०० सेकंदांच्या वेळेत पूर्ण केले.
तिसºया हिटमध्ये ४० प्रतिस्पर्धींमध्ये ३० व्यात तर तीन फेºयांनंतर ३४ व्या स्थानावर राहिला. तीन फे-यांत अव्वल २०
मध्ये स्थान मिळवू न शकल्याने तो चौथ्या फेरीत सहभागी होऊ शकला नाही. तीन फे-यात त्याचा एकूण स्कोअर दोन मिनिट २८.१८८ सेंकद असा राहिला.
केशवन याने तिसºया फेरीनंतर आपली स्लेड उचलून अभिवादन केले. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये त्याचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील वशिष्ठ येथे राहणारा केशवन हा भारताचा हिवाळी आॅलिम्पिकमधील चेहरा होता. त्याने २०११, २०१२, २०१६ अणि २०१७ मध्ये आशियाई ल्यूज चॅम्पियनशिप पटकावली होती. (वृत्तसंस्था)
भूकंप व वादळाचे सावट-
भूकंपाचा इशारा आणि वादळी हवामानामुळे हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील प्रशासन आणि आयोजन समितीच्या अधिकाºयांनी खेळाडू, संघव्यवस्थापक, विविध आंतरराष्टÑीय महासंघांच्या पदाधिकाºयांना गरम कपडे घालण्याचे आवाहन केले आहे.
उद्घाटन समारंभादरम्यान प्रचंड थंडी आणि नंतर कोरियाच्या पूर्व भागात ४.६ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आयोजकांनी विश्वास दिला, की क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केल्या आहेत तेथील जमीन ७ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्केसुद्धा सहन करू शकते.
रविवारी स्की अधिका-यांना पुरुषांच्या डाऊन हिल स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. वादळी वातावरणामुळे महिलांच्या स्लोपस्टाइल स्नोबोर्डिंगच्या पात्रता फे-यासुद्धा रद्द करण्यात आल्या.

Web Title:  Luge player Keshavan took retirement