शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CWG 2022:लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:14 IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण १४ पदके आली आहेत. १४ मधील ९ पदक वेटलिफ्टिंगमधून मिळाली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. बुधवारच्या दिवशी भारताकडून लवप्रीत सिंग सुवर्ण पदक जिंकण्याच्या शर्यतीत होता, मात्र  १०९ किलो वजनी गटाच्या श्रेणीतील लवप्रीतला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आणि कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. लवप्रीत सिंगने स्नॅच राउंडमध्ये शानदार खेळ दाखवला आणि तिन्ही प्रयत्नात भार यशस्वीपणे उचलला. त्याने स्नॅच राउंडमध्ये अनुक्रमे १५७ किलो, १६१ किलो आणि १६३ किलो वजन उचलले. तब्बल ३५५ किलो भार उचलून लवप्रीत सिंगने कांस्य पदकावर नाव कोरले आहे. 

स्नॅच राउंडपहिला प्रयत्न - १५७ किलो यशस्वी.दुसरा प्रयत्न - १६१ किलो यशस्वी.तिसरा प्रयत्न - १६३ किलो यशस्वी.

लवप्रीत सिंगने स्नॅच राउंडमध्ये देखील शानदार खेळ दाखवला आणि तिन्ही प्रयत्नाच यशस्वीपणे भार उचलला. त्याने स्नॅच राउंडमध्ये अनुक्रमे १८५ किलो, १८९ किलो आणि १९२ किलो वजन उचलले. या पद्धतीने लवप्रीतने एकूण ३५५ (१६३ + १९२) किलो भार उचलला आहे.

क्लिन ंड जर्क राउंडपहिला प्रयत्न - १८५ किलो यशस्वी. दुसरा प्रयत्न - १८९ किलो यशस्वी.तिसरा प्रयत्न - १९२ किलो यशस्वी. 

कोण आहे लवप्रीत सिंग? २४ वर्षीय लवप्रीत सिंग भारताला कांस्य पदक जिंकून दिले आहे, तो १०९ किलो वजनी गटाच्या श्रेणीत आहे. त्याने त्याच्या श्रेणीमध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते. याच विजयाने त्याला राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकिट मिळवून दिले होते. पंजाबमधील अमृतसर येथील लवप्रीतने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तसेच को राष्ट्रकुल ज्युनिअरचा चॅम्पियन देखील राहिला आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पदक विजेते भारतीय खेळाडू

  1. संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
  2. गुरूराजा पुजारी - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
  3. मीराबाई चानू - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
  4. बिंद्यारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
  5. जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
  6. अचिंता शेऊली - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ७३ किलो)
  7. सुशीला देवी - रौप्य पदक (ज्युडो ४८ किलो)
  8. विजय कुमार यादव - कांस्य पदक (ज्युडो ६० किलो)
  9. हरजिंदर कौर - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१ किलो)
  10. महिला संघ - सुवर्ण पदक (लॉन बॉल्स)
  11. पुरूष संघ - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
  12. विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
  13. मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक 
  14. लवप्रीत सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो)  
टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतWeightliftingवेटलिफ्टिंग