स्वप्नांवर प्रेम करा, स्वप्नांसाठी जगा

By Admin | Updated: February 18, 2017 01:12 IST2017-02-18T01:12:12+5:302017-02-18T01:12:12+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली खेळाडूंना आपल्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची पूर्तता करण्यासाठी कठोर

Love the dreams, wake up to dreams | स्वप्नांवर प्रेम करा, स्वप्नांसाठी जगा

स्वप्नांवर प्रेम करा, स्वप्नांसाठी जगा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली खेळाडूंना आपल्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची पूर्तता करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचा सल्ला दिला. येथे सुरू असलेल्या ४९ व्या केंद्रीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी तो बोलत होता.
तो म्हणाला, ‘जर माझ्या बोलण्यामुळे काही उपयोग होणार असेल तर येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व खेळाडूला सांगू इच्छितो की जर तुम्ही ठरविले असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. मी माझ्या आयुष्यात याच मंत्राने जगतो आहे. यासाठी कोणतेही बंधन नाही. हे तुमच्याबाबतीतही होऊ शकते.
कोहली म्हणाला, ‘जर तुम्ही याबद्दल विचार करीत असाल व तुम्ही हे करू शकता याबद्दल तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. यावेळी कोहलीने उपस्थित कुस्तीपटू बबिता व गीता फोगट यांचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘या दोघींची गोष्ट सर्व देशाने पाहिली. या दोघींनी देशासाठी खूप मोठी कामगिरी केलेली आहे.

Web Title: Love the dreams, wake up to dreams