लॉर्ड्सवर खेळणार आज क्रिकेटचे ‘लॉर्डस्’!

By Admin | Updated: July 5, 2014 08:46 IST2014-07-05T04:42:30+5:302014-07-05T08:46:38+5:30

इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. या पंढरीत क्रिकेटचे दैवत असलेले क्रिकेटपटू पुन्हा एकदा ‘याची देही याची डोळा’ खेळताना दिसतील.

Lord's to play at Lord's today! | लॉर्ड्सवर खेळणार आज क्रिकेटचे ‘लॉर्डस्’!

लॉर्ड्सवर खेळणार आज क्रिकेटचे ‘लॉर्डस्’!

‘एमसीसी एकादश’ विरुद्ध ‘रेस्ट आॅफ द वर्ल्ड’ : सचिन तेंडुलकरसह दिग्गज मैदानात

अजय नायडू ल्ल लंडन
इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. या पंढरीत क्रिकेटचे दैवत असलेले क्रिकेटपटू पुन्हा एकदा ‘याची देही याची डोळा’ खेळताना दिसतील. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह दिग्गजांचा समावेश आहे आणि ‘लॉर्ड्स’हीसामन्यासाठी सज्ज झालेय. ‘सेल आउट’ची पाटी लागलेल्या या मैदानावरील चाहत्यांना धुंदी लागलीय ती केवळ एका स्वप्नवत सामन्याची.
सचिन तेंडुलकर हा मार्लिबर्न क्रिकेट क्लबचे, तर शेन वॉर्न हा रेस्ट आॅफ द वर्ल्ड संघाचे नेतृत्व करणार आहे. हा विशेष सामना लॉर्ड्सच्या २०० व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ब्रायन लारा, केविन पीटरसन, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, सईद अजमल आणि मुथय्या मुरलीधरनसारखे दिग्गज मैदानात उतरतील.
हा सामना प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव देणारा ठरेल, तसेच खेळ म्हणूनच हा सामना रोमांचक ठरेल, असे निवृत्तीनंतर प्रथमच मैदानात उतरत असलेल्या सचिन तेंडुलरकने सांगितले. गेल्या दहा दिवसांपासून मी सरावाला सुरुवात केलीय.
बॅट आणि चेंडूचा योग्य मिलाप आणि त्यातून येणारा ‘टपटप’ असा आवाजयामुळे मी चांगला खेळू शकेन, असा विश्वास आहे. शेन वॉर्न म्हणाला की, सामना ‘टफ’ होईल यात शंका नाही; पण तो मौज म्हणूनही असेल.

संघ असे :
मार्लिबर्न क्रिकेट क्लब : सचिन तेंडुलकर (कर्णधार), ब्रायन लारा, राहुल द्रविड, सईद अजमल, शिवनारायण चंद्रपॉल, अ‍ॅरोन फिंच, उमर गुल, ब्रेट ली, क्रिस रिड, शॉन टेट आणि डॅनियल व्हेटोरी.
रेस्ट आॅफ वर्ल्ड : शेन वॉर्न (कर्णधार), मुथय्या मुरलीधरन, शाहिद आफ्रिदी, टिनो बेस्ट, पॉल कॉलिंगवूड, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, तामिम इक्बाल, केविन पीटरसन, वीरेंद्र सेहवाग, पीटर सिडल आणि युवराज सिंग.

वेळ : दुपारी ३.१५ वा. प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स

Web Title: Lord's to play at Lord's today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.