लॉर्ड्सवर सचिनच ‘लॉर्ड’!
By Admin | Updated: July 6, 2014 01:24 IST2014-07-06T01:24:18+5:302014-07-06T01:24:18+5:30
अपेक्षेप्रमाणो शनिवारचा दिवस संस्मरणीय ठरला. लॉर्ड्सचा 2क्क् वा जन्मदिवस आणि त्याचा उत्सव ख:या अर्थाने सार्थ ठरला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील एमसीसीच्या विजयाने.

लॉर्ड्सवर सचिनच ‘लॉर्ड’!
अजय नायडू - लंडन
अपेक्षेप्रमाणो शनिवारचा दिवस संस्मरणीय ठरला. लॉर्ड्सचा 2क्क् वा जन्मदिवस आणि त्याचा उत्सव ख:या अर्थाने सार्थ ठरला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील एमसीसीच्या विजयाने. भरगच्च स्टेडियमवरील चाहत्यांनी उन-पावसाच्या ‘खेळा’त झालेल्या अभूतपूर्व सामन्याचा आनंद लुटला. शेन वॉर्नच्या ‘रेस्ट ऑफ वल्डर्’ संघावर सचिनच्या एमसीसीने 7 गडी राखून मात केली. मात्र हा दिवस विजय-पराजयाचा नव्हता. तो होता क्रिकेटच्या आनंदोत्सवाचा अन् लाखो प्रेक्षकांचे आभार मानणारा.
सामन्यात दोघांनी शतक झळकाविली. रेस्ट ऑफ वर्ल्डचा युवराज सिंग (132) आणि एमसीसी इलेव्हनचा अॅरोन फिन्च (181). मात्र या शतकावीरांपेक्षाही अनेकांच्या नजरा होत्या त्या सचिन आणि लारा यांच्यावरच. छोटय़ाशा पण महत्वपूर्ण खेळीने सचिनने जिंकले आणि लाराच्या ‘कव्हरड्राईव्ह’ने सुद्धा चाहत्यांना मोहिनी टाकली. लाराने 23 तर सचिनने 44 धावा केल्या. एमसीसीने 294 धावांचे आव्हान 45.5 षटकांत गाठले.
त्याआधी, भारताच्या युवराज सिंगने केलेल्या 132 धावांच्या खेळीच्या जोरावर ‘रेस्ट ऑफ वर्ल्ड’ संघाने सचिनच्या ‘एमसीसी’ संघापुढे 294 धावांचे लक्ष्य उभारले. लॉर्डस मैदानावरील या प्रदर्शनीय सामन्यात युवराजने आपल्या डावात 134 चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. युवराजला सचिन तेंडुलकरने बाद केले. नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या शेन वॉर्नच्या ‘रेस्ट ऑफ वल्र्ड’ संघाने असताना 12 षटकांत 68 धावांवर पाच फलंदाज गमावले होते. मात्र युवराज सिंग आणि पॉल कॉलिंगवूड यांनी डाव सावरला. या जोडीने 131 धावांची भागीदारी केली. ब्रेट लीने सेहवागला (22) बाद करीत पहिले यश मिळवले.