दिखेगा रैना का जलवा
By Admin | Updated: November 8, 2014 03:22 IST2014-11-08T03:20:55+5:302014-11-08T03:22:58+5:30
डावखुरा सुरेश रैना हे भारतीय संघातील अनमोल रत्न आहे, २0१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याची लकाकी दिसून येईल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले.

दिखेगा रैना का जलवा
विनय नायडू, मुंबई
डावखुरा सुरेश रैना हे भारतीय संघातील अनमोल रत्न आहे, २0१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याची लकाकी दिसून येईल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले.
आगामी विश्वचषक आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशामध्ये संयुक्तपणे होत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून त्याने येथील ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी अनेक पैलूंबाबत तो मनमोकळेपणाने बोलला...
भारताचा आगामी आॅस्ट्रेलिया दौरा हा विश्वचषकातील यशाच्यादृष्टीने महत्त्वाचा असेल, असे सांगून फ्लेमिंग म्हणाला, भारतीय संघात अनेक क्वॉलिटी प्लेअर आहेत. पण डावखुरा सुरेश रैना माझ्यामते सर्वात सरस ठरतो. तो दिवसेंदिवस प्रगल्भ होत चालला आहे. उसळत्या चेंडूपुढे तो चाचपडतो. या कमजोरीवर त्याने आता मात केली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्याचाच बोलबाला असेल. भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचा प्रशिक्षक असलेला फ्लेमिंग म्हणतो, विश्वविजेतेपद आपल्याकडे कायम राखण्यासाठी भारताने स्मार्ट क्रिकेट खेळले पाहिजे. आॅस्ट्रेलिया दौरा त्यादृष्टीने महत्त्वाचा असेल.
भारताकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. श्रीलंकेविरुध्द ते चांगली कामगिरी करीत आहेत. हीच लय त्यांना कायम राखावी लागेल. सर्व काही सुरळीत चालेल यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी चांगली कामगिरी
केली नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या मिशन वर्ल्डकपवर होऊ शकतो. १४ फेब्रुवारी २0१५ ला विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पण तत्पूर्वी ४ डिसेंबर १४ ते ७ जानेवारी २0१५ या काळात भारतीय संघ तेथे कसोटी मालिका खेळेल. यापाठोपाठ
भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तिरंगी मालिका खेळविली जाणार आहे.
आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या भारतीय फिरकी गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असतील असे मत व्यक्त करुन फ्लेमिंग म्हणाला, खेळपट्ट्या चांगल्या असतील तर फिरकी गोलंदाजांचा येथे कस लागेल. न्यूझीलंडमध्ये तर सीमारेषा अतिशय जवळ असते त्यामुळे तेथे गोलंदाजी करताना त्यांना अवघड होईल.