खेळाडूंच्या ‘मोबाईल मेसेजेस’वर करडी नजर

By Admin | Updated: November 17, 2016 02:14 IST2016-11-17T02:14:59+5:302016-11-17T02:14:59+5:30

क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅचफिक्सिंगविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्वत:च्या भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या

Look at the players' mobile messages | खेळाडूंच्या ‘मोबाईल मेसेजेस’वर करडी नजर

खेळाडूंच्या ‘मोबाईल मेसेजेस’वर करडी नजर

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅचफिक्सिंगविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्वत:च्या भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीयू) माध्यमातून लवकरच संशयास्पद क्रिकेटपटूंच्या मोबाईल मेसेजेसचा तपास करण्याची योजना आखणार आहे.
एसीयू प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी बुधवारी ही माहिती देताना सांगितले की, आयसीसी सध्या खेळाडूंना मोबाईल रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याची मागणी करू शकते. क्रिकेटपटू सध्या सामन्याच्या दिवशी खेळ सुरू होण्याआधी आपापले मोबाईल अधिकाऱ्यांकडे जमा करतात. तथापि, व्हॉटस्अ‍ॅप तसेच स्नॅपचॅटच्या माध्यमातून होणाऱ्या संवादापर्यंत पोहोचण्यात एसीयूला अडचण येत आहे.
बदलत्या काळानुसार अलीकडे व्हॉटस्अ‍ॅप आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियाचा वापर सोपा झाला आहे. अशा वेळी आधुनिकतेशी सांगड घालून पुढे जावे लागेल. खेळाडूंच्या बिल रेकॉर्डस्ऐवजी टेनिसपटूंसारखे खेळाडूंच्या कम्युनिकेन डिव्हाईसपर्यंत पोहोचण्याचा आमचा विचार आहे. यामुळे झालेल्या संवादाची संपूर्ण माहिती मिळणे शक्य होईल. एसीयूला आयसीसी बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
द. आफ्रिकेचा माजी खेळाडू अल्विरो पीटरसन याला अलीकडेच स्थानिक टी-२० सामन्यात फिक्सिंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. त्याच्यावर क्रिकेटच्या सर्वच प्रकारात अस्थायीरीत्या बंदी घालण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Look at the players' mobile messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.