दीपिकाची ‘सुवर्ण’वर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 03:26 IST2017-09-02T03:26:18+5:302017-09-02T03:26:22+5:30

चारवेळची उपविजेती भारतीय स्टार दीपिका कुमारी आज शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत यंदा सुवर्णावर नाव कोरण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.

Look at Deepika's 'gold' look | दीपिकाची ‘सुवर्ण’वर नजर

दीपिकाची ‘सुवर्ण’वर नजर

रोम: चारवेळची उपविजेती भारतीय स्टार दीपिका कुमारी आज शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत यंदा सुवर्णावर नाव कोरण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.
विश्वचषकाच्या चार टप्प्यातील आघाडीचे सात आणि यजमान देशाचा एक खेळाडू या दोन दिवसांच्या स्पर्धेत सहभागी होईल. त्यातून यंदाच्या मोसमातील सर्वोत्कृष्ट तिरंदाजाचा ‘फैसला’ होईल. पहिल्या दिवशी कम्पाऊंड प्रकारचे सामने होतील. या प्रकारात एकाही भारतीयाचा समावेश नाही. दीपिका थेट उपांत्यपूर्व फेरीत ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी सामना खेळणार आहे. दीपिकाला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आणि मागील स्पर्धेची कांस्य विजेती चायनीज तायपेईची २३ वर्षांची खेळाडू टिंग टॉन हिच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. टॉनने आधीही दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. यंदा तीन सुवर्ण आणि दोन रौप्य जिंकल्यामुळे टॉनला तिसरे मानांकन मिळाले आहे. दीपिकाने रिओ आॅलिम्पिक आधी अंताल्या येथे २०१६ मध्ये विश्वचषकात भाग घेतला होता.’

Web Title: Look at Deepika's 'gold' look