शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 09:26 IST

आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे.

औरंगाबाद : एकाच वेळी अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनचा, लंडनचे प्रख्यात पर्यटनविषयक नियतकालिक ‘कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हलर’ने २०२१-२२ मध्ये धावपटूंनी भाग घेतला पाहिजे अशा भारतातील दहा निवडक  मॅरेथॉनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जगभरातील धावपटूंचे लक्ष ‘लाेकमत महामॅरेथॉन’कडे आकर्षिले गेले आहे.आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. आता लंडनच्या जागतिक नियतकालिकाने या स्पर्धेची दखल घेतल्यामुळे जागतिक पातळीवरील धावपटूदेखील या स्पर्धेकडे आकर्षित होतील. या नियतकालिकाचे जगभरात ऑनलाईन व ऑफलाईन असे असंख्य वाचक असून, त्याची  भारतीय आवृत्तीही आहे. त्यामुळे लोकमत महामॅरेथॉनसाठी हे गौरवास्पद यश आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी औरंगाबादेत होत असलेल्या महामॅरेथॉनसाठी ही उत्साहवर्धक घटना आहे. ही महामॅरेथॉन ५, १० आणि २१ किलोमीटर गटात होणार आहे. 

काय आहे महामॅरेथॉन?- लोकमत महामॅरेथॉन देश-विदेशातील धावपटूंसाठी आणि सर्वसामान्यांच्याही पसंतीची स्पर्धा ठरली आहे. - ही सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी एक आरोग्य चळवळ ठरली आहे. - सर्व क्षेत्रांतील, तसेच शहरी व ग्रामीण भागांतील नागरिक यात सहभागी होत आले आहेत.

लोकमत महामॅरेथॉनच्या दर्जावर शिक्कामोर्तब : रुचिरा दर्डा-    ‘कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हलर’कडून भारतातील पहिल्या १० मॅरेथॉनमध्ये ‘लोकमत महामॅरेथॉन’ची निवड होणे हे महामॅरेथॉनच्या दर्जावर जागतिक पातळीवर झालेले शिक्कामोर्तब आहे, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा यांनी व्यक्त केली. - श्रेय महामॅरेथॉनच्या संपूर्ण चमूला जाते. ही स्पर्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचाच सतत प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतLondonलंडन