लोकमत एनपीएल क्रिकेट -२
By Admin | Updated: January 23, 2016 00:09 IST2016-01-22T23:50:17+5:302016-01-23T00:09:15+5:30
मराठा वॉरियर्सचा ५४ धावांनी विजय

लोकमत एनपीएल क्रिकेट -२
मराठा वॉरियर्सचा ५४ धावांनी विजय
लोकमत एनपीएल क्रिकेट : पहिले शतक झळकविणारा दिनेश शिंदे सामनावीर
नाशिक : राजुरी स्टील प्रस्तूत लोकमत एनपीएल क्रिकेट महोत्सवातील दहाव्या सामन्यात दिनेश शिंदे या अष्टपैलू खेळाडूने शतक झळकवून मराठा वॉरियर्सला शानदार विजय मिळवून दिला. २० षटकांत ६ बाद १७२ धावा करणार्या मराठाने ५४ धावांनी संदीप फाल्कन्स संघाला हरविले. संदीप फाल्कन्स हा संघ २० षटकांत ८ गडी बाद केवळ ११८ धावा करू शकला. संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करणार्या मराठा वॉरियर्सचा दिनेश शिंदे याने ५८ चेंडूत ७ षटकार व ६ चौकार मारून नाबाद शतक ठोकले. त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याला संघातील अक्षय सोनार याने २५ धावा, कपिल शिरसाठ याने २३, तर हर्षद मेर याने ११ धावा देऊन संघाची धावसंख्या वाढविण्यास मदत केली. संदीप फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना वीराज ठाकूर व श्रीकांत शेरीकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर लाभेश सोनवणे याने एक गडी बाद केला. गौरव काळे याने तीन षटकांत ३१, तर मनोज परमार याने चार षटकांत ३६ धावा दिल्या. संदीप फाल्कन्सतर्फे फलंदाजी करताना सुनील यादव याने ८ चेंडूत एक षटकार व दोन चौकार मारत १५ धावा केल्या, तर सौरभ देवरे याने १४ चेंडूत १४ धावा केल्या. विराज ठाकूर याने २९ चेंडूत ३२ धावा करताना चार चौकार मारले. केतन कस्तुरे याने ११ चेंडूत २१ धावा करताना दोन षटकार व एक चौकार मारला. मराठा वॉरियर्सतर्फे गोलंदाजी करताना मोहन केसी याने चार षटकांत ३३ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर उदय बोडके, कुणाल कोठावदे, अनिल लहामगे व दिनेश शिंदे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
फोटो क्रमांक: २२पीएचजेए ९६....उदय बोडकेच्या चेंडूवर मनोज परमारचा उडालेला त्रिफळा.
फोटो क्रमांक : २२पीएचजेए ९८....मराठा वॉरियर्स विरुद्ध संदीप फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चित्तथरारक क्षण.
फोटो क्रमांक: २२पीएचजेए ९१....मराठा वॉरियर्स विरुद्ध संदीप फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी नाणेफेकप्रसंगी उपस्थित प्रा. गौरव सोनवणे, सौरभ हरी सोनकांबळे, माया जगताप, कर्णधार मनोज परदेशी, हरी सोनकांबळे, प्रभाकर दाते, गोपाळ पाटील, राजेंद्र निकम, कर्णधार योगेश महाले, आनंद खरे, सुरेश लासुरे, अविनाश गोठी व नंदलाल धांडे.