लोकेशची बांगलादेश दौऱ्यातून माघार
By Admin | Updated: June 7, 2015 12:31 IST2015-06-07T01:04:05+5:302015-06-07T12:31:03+5:30
कर्नाटकचा प्रतिभावान सलामीवीर लोकेश राहुल अद्याप डेंग्यूच्या आजारातून सावरला नसल्याने तो बांगलादेश दौऱ्याला मुकणार आहे.

लोकेशची बांगलादेश दौऱ्यातून माघार
कोलकाता : कर्नाटकचा प्रतिभावान सलामीवीर लोकेश राहुल अद्याप डेंग्यूच्या आजारातून सावरला नसल्याने तो बांगलादेश दौऱ्याला मुकणार आहे. आॅस्ट्रेलियातील मेलबोर्नमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला प्रारंभ करणारा २३ वर्षीय राहुल १० जूनपासून बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी अनफिट ठरला. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले,‘के.एल. राहुल अद्याप आजारातून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.’ राहुलने कसोटी कारकिर्दीचा शानदार प्रारंभ करताना सिडनी कसोटी सामन्यात चमकदार ११० धावांची खेळी केली होती.