लोढा समितीने फेटाळले बीसीसीआयचे अपील
By Admin | Updated: August 9, 2016 03:40 IST2016-08-09T03:40:29+5:302016-08-09T03:40:29+5:30
सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९ आॅगस्टला होणारी बैठक रद्द करण्यासाठीचे अपील फेटाळून लावले आहे.
_ns.jpg)
लोढा समितीने फेटाळले बीसीसीआयचे अपील
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९ आॅगस्टला होणारी बैठक रद्द करण्यासाठीचे अपील फेटाळून लावले आहे.
बीसीसीआयने माजी न्या. मार्कं डेय काटजू यांना आपला कायदेविषयक सल्लागार बनविले होते. यानंतरच मंडळाने लोढा समितीला मंगळवारी आयोजित बैठक रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र लोढा समितीने ही मागणी फेटाळली. बीसीसीआयला या बैठकीत लोढा समितीच्या शिफारशींना सहा महिन्यांत लागू करण्याच्या विषयावर चर्चा करायची होती. दरम्यान, काटजू यांनी बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाकडे समीक्षा याचिका दाखल करणे व समितीची भेट न घेण्याची सूचना केली होती. (वृत्तसंस्था)