लोकल बातम्या

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:18+5:302015-02-11T00:33:18+5:30

ज्युडो : अथर्वला सुवर्ण

Local News | लोकल बातम्या

लोकल बातम्या

युडो : अथर्वला सुवर्ण
नागपूर : ईश्वर देशमुख शरीरिक शिक्षण महाविद्यालय हनुमाननगर सभागृहात झालेल्या जिल्हास्तर ज्युडो स्पर्धेत अथर्व संजय बोंडे याने १२ वर्षांखालील मुलांच्या २५ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. तो सोमलवार हायस्कूल रामदासपेठ शाखेचा विद्यार्थी आहे. राज्य सब ज्युनियर स्पर्धेसाठी अथर्वची जिल्हा संघात निवड करण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)
..................
जलतरण : पार्थ महाराष्ट्र संघात
नागपूर : राजकोट येथे होणाऱ्या शालेय गटाच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी के. जॉन पब्लिक स्कूलचा विद्यार्थी पार्थ विक्रम भोसले याची महाराष्ट्र संघात निवड झाली. सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेत पार्थने १४ वर्षे गटात रौप्य पदक जिंकले होते. पार्थ हा रघुजीनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या जलतरण कक्षावर आनंद भोसले यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. (क्रीडा प्रतिनिधी)
......................
साऊथ पॉईंटला नाहातकर करंडक
नागपूर : साऊथ पॉईंट स्कूलने ११ वर्षे गटातील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत सेंट झेव्हियर्स स्कूलचा पराभव करीत बाबासाहेब नाहातकर करंडक जिंकला. दादासाहेब कर्णेवार क्रिकेट आयोजन समितीतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंतिम लढतीतत सेंट झेव्हियर्सने २० षटकांत २ बाद ९१ धावा उभारल्या. सुयोग भगत याने ३९ आणि वेदांत गोळे याने ३१ धावा केल्या. साऊथ पॉईंटकडून चिन्मय काळेच्या नाबाद ३४ आणि रुतुल पानबुडेच्या नाबाद ३६ धावांमुळे साऊथ पॉईंटने हा सामना बिनबाद ९२ धावा करीत १० गड्यांनी जिंकला. चिन्मय सामन्याचा मानकरी ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Local News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.