लोकल खो-खो

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:43+5:302015-02-21T00:50:43+5:30

विदर्भ युथ क्रीडा मंडळ पराभूत

Local Kho-Kho | लोकल खो-खो

लोकल खो-खो

दर्भ युथ क्रीडा मंडळ पराभूत
महापौर चषक अ.भा. खो-खो स्पर्धा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महापौर चषक अखिल भारतीय खो-खो स्पर्धेत पुरुष विभागात जयहिंद क्रीडा मंडळ (इचलकरंजी) आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ (पुणे) संघांनी आगेकूच कायम राखली. काटोलच्या विदर्भ युथ क्रीडा मंडळाला दोन्ही साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
चिटणीस पार्कमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत जयहिंद क्रीडा मंडळाने दिल्लीच्या ईगल क्लबचा(११-३) एक डाव शिल्लक ठेवत ८ गड्यांनी धुव्वा उडविला. त्याआधी, जयहिंद क्रीडा मंडळाने बेंगळुरूच्या कासनंबा खो-खो क्लबला (१६-१४) नमविले.
पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने काटोलच्या विदर्भ युथ क्रीडा मंडळाचा(१६-१४) दोन गड्यांनी पराभव केला. नवमहाराष्ट्रचा मुकेश गोसावी अडीच मिनिटे खेळला व ४ गडी बाद केले. पराभूत संघाच्या पलाश बुरसे, निखिल आसटकर यांनी चांगला खेळ केला, पण संघाचा पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले. गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात नवमहाराष्ट्र संघाने नाशिकच्या संस्कृती स्पोर्ट्सला (११-१०) एक डाव शिल्लक ठेवत एका गड्याने पराभूत केले. विदर्भ युथ क्रीडा मंडळाला पहिल्या सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाकडून आणि दुसऱ्या सामन्यात पश्चिम बंगाल खो-खो असोसिएशनकडून पाच गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.
महिला गटात सातारा येथील साखरवाडी, केरळ-१२, ठाणे येथील शिवभक्त क्रीडा मंडळ, पश्चिम बंगाल खो-खो असोसिएशन आणि मुंबई उपनगर येथील महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत आव्हान कायम राखले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Local Kho-Kho