लोकल फुटबॉल
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30
यंग इक्बालची दमदार सलामी

लोकल फुटबॉल
य ग इक्बालची दमदार सलामीएलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेला प्रारंभनागपूर : यंग इक्बालने डीएसए मध्य रेल्वेचा ३-० ने पराभव करीत नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली रविवरापासून प्रारंभ झालेल्या एलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत दमदार सलामी दिली. स्पर्धेचे आयोजन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मोतीबाग मैदानावर करण्यात आले आहे. या लढतीत यंग इक्बाल संघाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले तर मध्य रेल्वे संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. यंग इक्बाल संघाने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी मिळवली होती. खाते उघडण्यासाठी ३९ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. शरीक नदीमने यंदाच्या स्पर्धेत पहिला गोल नोंदवला. मध्यंतरानंतर शाकिब अन्वरने गोल नोंदवित यंग इक्बाल संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ६५ व्या मिनिटाला मोहम्मद शाबादने गोल नोंदवित यंग इक्बाल संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून देताना विजय निश्चित केला. सामन्यात धुसमुसळा खेळ करणाऱ्या रेल्वेच्या तीन खेळाडूंना (मोहम्मद जुनेद, इशरत कमाल आणि चेतन खरे) यांना रेफरीने ताकीद दिली. या स्पर्धेत सोमवारी दुपारी ३ वाजता गतविजेता नागपूर फुटबॉल क्लब विरुद्ध शहर पोलीस संघांदरम्यान लढत होईल. त्याआधी, आमदार व नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष समीर मेघे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष हरेश व्होरा, सलीम बेग, सचिव युजेन नोर्बेट, कोषाध्यक्ष इक्बाल कश्मिरी, अशोक यादव, करमचंद चौरसिया, एस.एम. मसी, सुनील कोचर, प्रदीप नगरकर आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)