लोकल१

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:25+5:302014-12-18T22:39:25+5:30

१३ वर्षे गटाची आंतर शालेय

Local 1 | लोकल१

लोकल१

वर्षे गटाची आंतर शालेय
बास्केटबॉल स्पर्धा
नागपूर : सोमलवार अकादमी शिक्षण संस्थेच्यावतीने तिसऱ्या दादासाहेब सोमलवार स्मृती १३ वर्षांखालील आंतर शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन १९ जानेवारीपासून शिवाजी नगर जिमखाना मैदानावर होईल. यात मुलामुलींचे शालेय संघ सहभागी होतील.
१ जानेवारी २००२ नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. इच्छूक संघांनी २३ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आशिष भिडे यांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
...............................................................................................
आंतर क्लब बॅडमिंटन सामने आजपासून
नागपूर : स्वावलंबीनगर येथील नासुप्रच्या महात्मा ज्योतिबा फुले क्रीडा संकुलात दहा वर्षे ते मास्टर्स गटापर्यतचे आंतर क्लब बॅडमिंटन सामने उद्या दि.१९ पासून सुरू होत आहेत. २१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत १०,१३, १५, १७ वर्षे मुले आणि मुली, पुरुष आणि महिला गट तसेच ३५ वर्षांवरील प्रौढ गटात एकेरी तसेच दुहेरीचे सामने खेळविले जातील, असे आयोजकांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
...............................................................................

Web Title: Local 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.