लोकल

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:05+5:302014-12-19T22:57:05+5:30

१२ वर्षांखालील मुलांसाठी

Local | लोकल

लोकल

वर्षांखालील मुलांसाठी
आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा
नागपूर : अनुग्रह स्पोर्टस् अकादमीतर्फे १२ वर्षांखालील मुलांची आंतर शालेय सिक्स अ साईड फुटबॉल स्पर्धा १६ जानेवारीपासून आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेला नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत प्रत्येक बुधवार ते शनिवार या दिवशी सामने खेळविण्यात येतील. दोन महिन्यांत ४६ सामन्यांचे आयोजन होणार आहे. स्पर्धेत केवळ २४ संघांना प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी नोएल जोसेफ यांचेशी संपर्क करावा, असे आयोजकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

......................................................................
सूर्यनमस्कार स्पर्धेत
भिडे गर्ल्सचे खेळाडू चमकले
नागपूर : भिडे गर्ल्स हायस्कूल संघाने क्रीडा भारतीच्या नागपूर केंद्राद्वारे आयोजित आंतर शालेय सूर्यनमस्कार स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. आठव्या आणि नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भिडे कन्या शाळेला शिल्ड आणि प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेच्या क्रीडा शिक्षिका नीता नेवारे आणि गजानन राठोड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. (क्रीडा प्रतिनिधी)
...............................................................................

Web Title: Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.