शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

LMOTY 2023: भारताचा स्टार युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:22 IST

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

LokmatMaharashtrianOfTheYear : लोकसेवा/समाजसेवा, आयएएस, आयपीएस, राजकारण, शिक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग/व्यवसाय, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने जगभरात महाराष्ट्राचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या गुणवंतांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदाचा क्रीडा विभागातील  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव ( Aniket Jadhav, Football, Kolhapur, Sports) याला प्रदान करण्यात आला. महिला क्रिकेटपटू किरण नवगिरे (  सोलापूर), क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर (  तुळजापूर, धाराशिव), बुद्धीबळपटू रौनक साधवानी ( नागपूर) आणि नेमबाज रुद्रांक्ष पाटील ( पालघर ) यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु अनिकेतने बाजी मारली.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. 

रिक्षा चालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेत जाधवचा प्रवास आहे. अवघ्या १७ व्या वर्षी त्याला जगातील २३ देशांतील संघाविरोधात खेळण्याची संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणारा तो कोल्हापुरातील एकमेव फुटबॉलपटू. वडील रिक्षा चालक, आई गृहिणी अशा सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे. घरची परिस्थिती बेताचीच. शाळेच्या मैदानावर फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरवले. पाचवीपासून त्याचे पुणे क्रीडा प्रबोधिनीत शिक्षण झाले आहे. अनिकेतची २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र राज्य संघातून सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. त्यातील कामगिरीमुळे तो ओळखला जाऊ लागला. 

२०१४ मध्ये जर्मनीतील बार्यन म्युनिच या व्यावसायिक फुटबॉल क्लबने युवा फुटबॉलपटू शोधमोहीम घेतली. त्यात पुणे येथे निवड चाचणीत अनिकेत सर्वच पातळीवर सरस ठरला. त्याची जर्मनीला निवड झाली. बार्यन म्युनिच संघाकडून त्याने जर्मनीतील अव्वल संघांविरोधात अनेक गोल केले. त्याच्या या कामगिरीसाठी गोल्डन बूटचा तो मानकरी ठरला. त्याची कामगिरी पाहून जर्मनीतील प्रसिद्ध व्यावसायिक फ्रँकफर्ट क्लबने लाखो डॉलरला खेळण्याची ऑफर दिली. मात्र, देशासाठी खेळायचे आहे म्हणून ही ऑफर त्याने नम्रपणे नाकारली. #LMOTY2023

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत