LIVE : रिओ कुस्ती - विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात तर साक्षी मलिक विजयी
By Admin | Updated: August 17, 2016 20:47 IST2016-08-17T19:47:21+5:302016-08-17T20:47:57+5:30
दुसऱ्या उपउपांत्यपुर्व सामन्यात साक्षी मलिकने विजय संपादन करत उपांत्यपुर्व सामन्यात प्रवेश केला. ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकने मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव केला.

LIVE : रिओ कुस्ती - विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात तर साक्षी मलिक विजयी
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १७ : उपांत्यपुर्व फेरीतील सामन्यादरम्यान जखमी झाल्यामुळे विनेश फोगटला पराभवला सामोर जाव लागलं, सामन्यादरम्यान चीनच्या सॅन येनानाशी दोन हात करताना तिला जखम झाली. सामन्याच्या सुरवातीपासूनच सॅन अक्रमक होती पण फोगटने तिला जश्याच तशे प्रतिउत्तर दिलं मात्र, जखमी असल्यामुळे विनेशने चीनच्या सुन यानानविरुद्ध लढतीतून माघार घेतली. ४८ किलो वजनी गटाच्या लढतीदरम्यान विनेशचा उजवा गुडघा दुखावला झाली आणि खेळणे कठिण जात असल्यामुळे सॅनला विजयी घोषित केले. त्यामुळे विनेशचे स्पर्धेतील आव्हान संपुुष्टात आले आहे.
दुसऱ्या उपउपांत्यपुर्व सामन्यात साक्षी मलिकने विजय संपादन करत उपांत्यपुर्व सामन्यात प्रवेश केला. ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकने मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव केला. साक्षी मलिकने ५-५ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला. सामन्यात समान गुण झाल्यानंतर साक्षी मलिकला बचावत्मक आणि आक्रमक पवित्र्यामुळे पंचानी विजयी घोषित केले.
रिओ ऑलिम्पिकमधील महिला कुस्तीमध्ये भारताच्या विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी विजय मिळवला आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात विनेश फोगटने या विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगटने रोमानियाच्या एमिलिया एलिना ११-० असा दारुन पराभव केला आहे. तर ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने ५-४ अशा फरकाने विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
साक्षीने स्वीडन जोहाना मॅटसोनचा पराभव करत आपला विजय संपादन केला. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या कामगीरीमुळेभारताला त्यांच्याकडून पदकाची आशा आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत साक्षी मलिक मोल्दोव्हाच्या मेरियाना सोबत लढणार आहे. तर उपांत्यपूर्वसामन्यात विनेश फोगट चीनच्या सॅन येनानाशी दोन हात करणार आहे. विनेश फोगटने चीनच्या खेळाडूचा पराभव केल्यास तीचा अंतिम ४ खेळाडूमध्ये सहभाग होईल. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या सामन्यास थोड्याच वेळात होणार सुरवात होणार आहे.
- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्तीमधील ५८ किलो वजनी गटातील साक्षी मलिकचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यास सुरुवात
- महिला कुस्तीमधील ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकचा विजय. मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील फेरीत केली प्रवेश
- मोल्दोव्हाच्या मेरियाना ५-५ अशा फरकाने केला पराभव.
- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - ४८ किलो वजनी गटातील विनेश फोगटच्या सामन्यास सुरवात
- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - सामन्यादरम्यान विनेश फोगट जखमी
- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - सामन्यादरम्यान जखमी झाल्यामुळे विनेश फोगटचा पराभव
- महिला कुस्ती - चीनच्या सॅन येनानाचा विजय, जखमी विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात