Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान

By Admin | Updated: March 2, 2016 21:34 IST2016-03-02T21:28:52+5:302016-03-02T21:34:28+5:30

आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेला सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' आहे.

Live - Pakistan's Pakistan in the Asia Cup final | Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान

Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान

ऑनलाइन लोकमत 

मिरपूर, दि. २ - आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेला सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' आहे. कारण या सामन्यातील पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशने ९ षटकात दोन गडी गमावून ५० धावा केल्या आहेत. सरफराझ अहमद नाबाद ५८ आणि शोएब मलिकचा ४१ अपवाद वगळता अन्य पाकिस्तानी फलंदाजांनी सपशेल निराशा केली. 
एका टप्प्यावर पाकिस्तानचे २८ धावात चार फलंदाज तंबूत परतले होते. सरफराझ आणि शोएबने पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करुन पाकिस्तानचा डाव सावरला. 

Web Title: Live - Pakistan's Pakistan in the Asia Cup final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.