लियोनेल मेस्सीचा जादुई गोल

By Admin | Updated: June 17, 2014 04:01 IST2014-06-17T04:01:09+5:302014-06-17T04:01:09+5:30

बार्सिलोनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी याने फिफा विश्वचषकात रविवारी शानदार गोल नोंदवून अर्जेंटिनाला बोस्रिया- हर्जेगोविनाविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला

Lionel Messi's Magical Goal | लियोनेल मेस्सीचा जादुई गोल

लियोनेल मेस्सीचा जादुई गोल

रियो दी जेनेरियो : बार्सिलोनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी याने फिफा विश्वचषकात रविवारी शानदार गोल नोंदवून अर्जेंटिनाला बोस्रिया- हर्जेगोविनाविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला. हा सामना अर्जेंटिनाने जिंकला, तरी विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या बोस्रियाने आपल्या खेळाने सर्वांना चकित करीत उपस्थितांची मने जिंकली.
मेस्सीने तिसऱ्या मिनिटाला बोस्रियाचा सीड कोलासिनाच याला आत्मघातकी गोल नोंदविण्यास भाग पाडताच अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळाली होती. बोस्रियासाठी विश्वचषकात सर्वांत कमी वेळेत मारलेला हा आत्मघातकी गोल ठरला. गोल झाला त्या वेळी दोन मिनिटे आठ सेकंदांचा खेळ झाला होता.
मेस्सीला बराच वेळ गोलफळीपासून
दूर ठेवण्यात त्यांना यश आले.
अखेर ६५ व्या मिनिटाला मेस्सीने गोंजालो हिगुएनच्या पासवर बचाव फळीतील दोन खेळाडूंना चकवीत डाव्या पायाने चेंडू गोलजाळीत ढकलला़ चेंडू गोलजाळीत जाण्याआधी डाव्या पोस्टला लागला होता. यावर अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. हिगूएन घोट्याच्या दुखण्याने त्रस्त आहे, बोस्रियाने मेस्सीला संपूर्ण वेळेत कधीही मोकळीक दिली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Lionel Messi's Magical Goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.