शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Lionel Messi नं साधला मोठा डाव; Cristiano Ronaldo च्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:00 IST

मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांमध्ये नेहमची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे.

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप पात्रता फेरीतील लढतीत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटूलिओनेल मेस्सीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अर्जेंटिनाच्या संघाने पात्रता फेरीतील सामन्यात बोलिव्हिया संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयात मेस्सीनं मोलाचा वाटा उचलला. एवढेच नाही तर हॅटट्रिकचा डाव साधत त्याने खास इतिहास रचला आहे. या कामगिरीसह मेस्सीनं पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधणारे फुटबॉलपटू 

आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात लिओनेल मेस्सीनं दहाव्यांदा हॅटट्रिकची किमया साधली. यासह त्याने रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोनाल्डोनं देखील आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १० वेळा हॅटट्रिकचा पराक्रम करून दाखवला आहे. फुटबॉल  जगतात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इराणचा दिग्गज अली दाई हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ वेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे. 

मेस्सी बऱ्याच कालावधीनंतर आपल्या देशाच्या संघाकडून उतरला मैदानात  गत वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना आणि बोलिव्हिया यांच्यातील सामना ब्यूनस आयर्सच्या एस्टाडिओ मास मुमेंटल अर्थात जे रिवर प्लेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. जूलैनंतर मेस्सी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. याआधी मेस्सी कोपा अमेरिका २०२४ च्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांमध्ये नेहमची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. यात आता हॅटट्रिकच्या शर्यतीत दोघांच्यात एकदम तगडी फाइट पाहायला मिळत आहे. 

सर्वाधिक गोल करण्यात कोण आहे नंबर वन?

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही या दोघांमध्येच स्पर्धा दिसून येते. यात रोनाल्डो २०१६ सामन्यातील १३३ गोलसह आघाडीवर आहे. वर्ल्ड चॅम्पियन मेस्सीच्या खात्यात ११२ गोलची नोंद आहे. १८९ सामन्यात त्याने इथपर्यंत मजल मारलीये. इराणचा अली दाई इथंही १०९ गोलसह तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते. फुटबॉल जगतात हे तीनच खेळाडू असे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक गोल करण्याचा पराक्रम नोंदवला आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलLionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२