शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लुईस हॅमिल्टनने पटकावले सहावे विक्रमी विश्वविजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 03:26 IST

फॉर्म्युला वन : दिग्गज मायकल शुमाकरचा विश्वविक्रम आला आवाक्यात

ऑस्टिन : ब्रिटनचा दिग्गज फॉर्म्युला वन (एफ-वन) ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याला रविवारी झालेल्या अमेरिकन ग्रॅ. प्री. शर्यतीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याच्याच मर्सिडीज संघाच्या वालेटरी बोटास याने अव्वल स्थान राखत बाजी मारली. मात्र यानंतरही हॅमिल्टनने एकूण गुणतालिकेत सर्वाधिक गुणांसह आपले अव्वल स्थान भक्कम करताना विक्रमी सहाव्यांदा फॉर्म्युला वन विश्वविजेतेपद पटकावले. यासह जर्मनीचा दिग्गज मायकल शुमाकरच्या सात विश्वविजेतेपदांच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यापासून हॅमिल्टन केवळ एका जेतेपदाने दूर आहे.

३४ वर्षीय हॅमिल्टनने या शर्यतीत पाचव्या स्थानावरून, तर फिनलँडच्या बोटासने पहिल्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात केली. बोटासने सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना कोणालाही आपल्यापुढे जाऊ दिले नाही. दरम्यान, हॅमिल्टनने दोन वेळा या शर्यतीत बोटासला मागे टाकत आघाडी घेतली होती. मात्र, अखेरचे तीन लॅप बाकी असताना बोटासने मोक्याच्या क्षणी हॅमिल्टनला मागे टाकले. यानंतर मात्र हॅमिल्टनला पुन्हा आघाडी घेणे जमले नाही आणि बोटासने शर्यतीवर आपले नाव कोरले. त्याचवेळी बेल्जियमच्या मॅक्स वेरस्टापेनने तिसºया स्थानावर कब्जा केला. हॅमिल्टनने तब्बल १५०व्यांदा पोडियमवर जागा मिळवताना सलग ३१व्या शर्यतीमध्ये गुण मिळवण्याची कामगिरी केली. त्याने आपल्या कारकिर्दीत सहावे विश्वविजेतेपद मिळवले असून आता तो दिग्गज शुमाकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यात यशस्वी ठरतो का, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.अव्वल एफ-वन विश्वविजेते :मायकल शुमाकर(जर्मनी) : ७लुईस हॅमिल्टन(ब्रिटन) : ६जुआन मॅन्युअल फॅनजिओ (अर्जेंटिना) : ५अ‍ॅलन प्रोस्ट (फ्रान्स) : ४सेबेस्टियन वेटेल (जर्मनी) : ४रेसनंतर विश्वविजयाचा जल्लोषअमेरिकन ग्रँप्री शर्यतीत दुसºया स्थानी राहिल्यानंतर सर्वाधिक गुणांच्या जोरावर हॅमिल्टनचे विश्वविजेतेपद निश्चित झाले. यानंतर त्याने चाहत्यांसह सहाव्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष केला. हॅमिल्टन याआधी २००८, २०१४, २०१५, २०१७ व २०१८ साली विश्वविजेता ठरला होता. 

टॅग्स :carकार