रिओ ऑलिम्पिकसाठी 'गुडविल अॅम्बेसेडर' होण्यासाठी सचिनला पत्र

By Admin | Updated: April 26, 2016 16:22 IST2016-04-26T16:22:04+5:302016-04-26T16:22:04+5:30

रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड केल्यानंतर उठलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने मास्टर

Letter to Sachin to become a Goodwill Ambassador for Rio Olympics | रिओ ऑलिम्पिकसाठी 'गुडविल अॅम्बेसेडर' होण्यासाठी सचिनला पत्र

रिओ ऑलिम्पिकसाठी 'गुडविल अॅम्बेसेडर' होण्यासाठी सचिनला पत्र

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड केल्यानंतर उठलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि संगितकार ए आर रेहमान यांची सुद्धा'गुडविल अॅम्बेसेडर'म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि संगितकार ए आर रेहमान यांना 'गुडविल अॅम्बेसेडर'होण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे.
त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यास आम्ही यासंबंधीची माहिती रितसर जाहीर करु. तसेच, 'गुडविल अॅम्बेसेडर'म्हणून फक्त अभिनेता सलमान खानची निवड करण्यात आली नाही. तर, आणखी तीन ते चार जणांची या 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड करण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिली निवड ही अभिनेता सलमान खानची असल्याचे राजीव मेहता यांनी सांगितले. 
रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमानची 'गुडविल अॅम्बेसेडर' म्हणून निवड झाल्यानंतर लंडन ऑलिंपिकमध्ये भारताला ब्राँझपदक मिळवून देणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त, हॉकीचे माजी कप्तान धनराज पिल्ले यांच्यासह अनेक खेळांडूनी सलमान खानच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. 

 

Web Title: Letter to Sachin to become a Goodwill Ambassador for Rio Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.