क्लार्कबाबत लेहमन आशावादी
By Admin | Updated: December 5, 2014 23:51 IST2014-12-05T23:51:32+5:302014-12-05T23:51:32+5:30
भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या खेळण्याबाबत साशंकता असली तरी प्रशिक्षक लिमन मात्र त्याच्या खेळण्याबाबत आशावादी आहेत.
_ns.jpg)
क्लार्कबाबत लेहमन आशावादी
मेलबोर्न : भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या खेळण्याबाबत साशंकता असली तरी प्रशिक्षक लिमन मात्र त्याच्या खेळण्याबाबत आशावादी आहेत.
गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या क्लार्कला अॅडिलेड कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलेले आहे, पण त्याला अद्याप फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. फिलिप ह्युजचे गेल्या आठवड्यात निधन झाल्यानंतर क्लार्कचा पुनर्वसन कार्यक्रम प्रभावित झाला.
दरम्यान, लेहमन यांनी क्लार्क शुक्रवारी अॅडिलेडमध्ये सरावसत्रात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. क्लार्कला फलंदाजी करण्यात अडचण भासली नाही तर तो खेळू शकतो. सराव सत्रात तो कसा फलंदाजी करतो, यावर लक्ष राहणार आहे. सराव सत्रात जर त्याला फलंदाजी करताना अडचण भासली नाही तर तर तो नक्कीच सामन्यात खेळेल. (वृत्तसंस्था)