ली ना पहिल्या फेरीत झाली पराभूत

By Admin | Updated: May 28, 2014 04:36 IST2014-05-28T04:36:05+5:302014-05-28T04:36:05+5:30

माजी चॅम्पियन व दुसरे मानांकन प्राप्त चीनची स्टार महिला टेनिसपटू ली ना हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला

Lee lost in the first round | ली ना पहिल्या फेरीत झाली पराभूत

ली ना पहिल्या फेरीत झाली पराभूत

पॅरिस : माजी चॅम्पियन व दुसरे मानांकन प्राप्त चीनची स्टार महिला टेनिसपटू ली ना हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. क्रमवारीत १०३व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टिना मिलाडेनोव्हिचनने ली नाची झुंज ७-५, ३-६, ६-१ने मोडून काढत धक्कादायक निकाल नोंदविला. ख्रिस्टिनाने येथे २००९मध्ये ज्युनिअर गटात जेतेपदाचा मान मिळविला होता. ली ना हिला फ्रेंच ओपनमध्ये प्रथमच पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. ली ना हिने या सामन्यात ३७ टाळण्याजोग्या चुका केल्या. यंदाच्या मोसमात डॅनियल नेस्टरसह आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविणार्‍या ख्रिस्टिनाला दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या एलिसन रिस्केच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात जागतिक क्रमवारीत ३६व्या स्थानावर झेप घेणारी ख्रिस्टिना म्हणाली, ‘माझ्याकडे शब्द नाहीत. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या खेळाडूला पहिल्या फेरीत पराभूत करणे, अविश्वसनीय आहे. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Lee lost in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.