लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी

By Admin | Updated: July 16, 2016 17:46 IST2016-07-16T17:46:04+5:302016-07-16T17:46:04+5:30

लिएंडर पेसनं डेव्हिस चषक पुरुष दुहेरीत इटलीच्या निकोला पित्रांगेलीच्या सर्वाधिक 42 विजयांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे

Leander Paes's World Cup record | लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी

लिएंडर पेसने साधली विश्वविक्रमाची बरोबरी

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 - भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसनं डेव्हिस चषकात बोपण्णाच्या साथीनं कोरियाविरुद्धच्या लढतीतील दुहेरी सामना जिंकला आहे. या विजयामुळे लिएंडर पेसनं  डेव्हिस चषक पुरुष दुहेरीत इटलीच्या निकोला पित्रांगेलीच्या सर्वाधिक 42 विजयांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. पेस आतापर्यंत भारतासाठी पुरुष दुहेरीत 53 सामने खेळला असून त्यात तो केवळ 11 वेळा पराभूत झालाय.
 

Web Title: Leander Paes's World Cup record