बीसीसीआयमध्ये ‘नेता’राज
By Admin | Updated: December 6, 2015 01:38 IST2015-12-06T01:38:11+5:302015-12-06T01:38:11+5:30
बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असून त्यापैकी काहींना बाहेर केले तर ही संघटना अधिक व्यावसायिक होईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी

बीसीसीआयमध्ये ‘नेता’राज
नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असून त्यापैकी काहींना बाहेर केले तर ही संघटना अधिक व्यावसायिक होईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी संघटनेमध्ये चांगल्या व्यक्ती असणे आवश्यक असते, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना चॅपेल म्हणाले, ‘बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा आहे. त्यातील काहींना बाहेर करणे
चुकीचे ठरणार नाही.’ चॅपेल व्यतिरिक्त भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी, सलामीवीर गौतम गंभीर आणि न्यायमूर्ती मुकुल मुद््गल या चर्चेत सहभागी झाले होते. या सर्वांनी बीसीसीआयमध्ये पारदर्शिता आणि प्रामाणिकपणा असावा, अशी मागणी केली. चॅपेल पुढे म्हणाले, ‘भारताकडे आता मोठी शक्ती आहे, पण शक्तीसोबत जबाबदारीही येते, हे विसरता येणार नाही. माझा डीआरएसवर विश्वास नाही. ही अचूक पद्धत नाही, पण याचा वापर करायचा असेल तर सर्वांनी करायचा आणि नसेल तर हद्दपार करायचे.’
बीसीसीआय दडपण निर्माण करणारी संघटना आहे. बीसीसीआयतर्फे आपली मागणी रेटण्यासाठी दुसऱ्या बोर्डावर दडपण आणले जाते. डीआरएसचे उदाहरण देताना चॅपेल म्हणाले, क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी सारखे नियम असायला हवे, पण भारताने द्विपक्षीय मालिकेत याचा कधी वापर केला नाही.
- इयान चॅपेल