शेवटची सुरुवात पुन्हा एकदा

By Admin | Updated: June 13, 2014 04:31 IST2014-06-13T04:31:59+5:302014-06-13T04:31:59+5:30

विश्वकप फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गतविजेत्या स्पेनला नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

The last thing is once again | शेवटची सुरुवात पुन्हा एकदा

शेवटची सुरुवात पुन्हा एकदा

साल्वाडोर : विश्वकप फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गतविजेत्या स्पेनला नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीच्या निमित्ताने नेदरलँडला गेल्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.
जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत अवांतर वेळ संपण्यास चार मिनिटांचा अवधी शिल्लक असताना आंद्रेस इनिएस्टाने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने नेदरलँडचा पराभव करीत प्रथमच विश्वविजेतेपदाचा मान मिळविला. या वेळी उभय संघांचा ‘ब’ गटात समावेश असून, शुक्रवारी त्यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
या गटात असलेल्या अन्य संघांमध्ये चीन व आॅस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. नेदरलँड संघाचा कर्णधार रॉबिन वान पर्सी, आर्येन रोबेन, वेस्ले स्नायडेर, नायजेल डी जोंग आणि डर्क कुएट या पाच खेळाडूंना २०१०च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळण्याचा अनुभव आहे. एस्टोन विया व डिफेंजर रोन व्लार म्हणाले, ‘आम्हाला त्या वेळी विश्वविजेतेपद पटकाविण्याची सुवर्णसंधी होती. ‘तो पराभव आम्ही कदापि विसरू शकत नाही. त्या पराभवाचे शल्य अद्याप बोचत आहे.’ युरोपियन चॅम्पियन व विश्वकप विजेता स्पेन संघ सलग दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या ब्राझील व इटली या संघांच्या पंक्तीत स्थान मिळविण्यास उत्सुक आहे. व्हिन्सेट डेल बोस्क युरो २०१२ फायनल जिंकणाऱ्या संघात केवळ एक बदल करण्याची शक्यता आहे. राईट बॅक अल्वारो अर्बेलोआच्या स्थानी चेलसीच्या सेजार ए याला संधी मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The last thing is once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.