लंका क्रिकेट जोड
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.

लंका क्रिकेट जोड
भ रताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने १९९७ मध्ये श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळले, पण हे दोन्ही सामने अनिर्णीत संपले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विदेशात यश मिळवले, पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेत श्रीलंका संघाला पराभूत करण्याचा पराक्रम करता आला नाही.गांगुली २००१ मध्ये श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार होता. तीन सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने निकाली ठरले, पण श्रीलंका संघ २-१ ने मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला. अजंता मेंडिसच्या फिरीकपुढे भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी भारताने एका लढतीत विजय मिळवला होता. श्रीलंकेत धोनीच्या नेतृत्वाखालीही संघाचे नशीब बदलले नाही. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतील संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसला तरी विजयही मिळवता आला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. त्यामुळे १९९३ पासून भारताला श्रीलंकेत मालिका विजय साकारता आलेला नाही.