कोहलीने केले क्लार्कचे अभिनंदन

By Admin | Updated: August 9, 2015 22:51 IST2015-08-09T22:51:36+5:302015-08-09T22:51:36+5:30

मायकल क्लार्कच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करणाऱ्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराचे शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन केले

Kylie congratulated Clark | कोहलीने केले क्लार्कचे अभिनंदन

कोहलीने केले क्लार्कचे अभिनंदन

कोलंबो : मायकल क्लार्कच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करणाऱ्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराचे शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन केले. क्लार्क इंग्लंडविरुद्ध पाचव्या व अखेरच्या कसोटीनंतर निवृत्ती स्वीकारणार आहे.
कोहलीने क्लार्कची प्रशंसा करताना टिष्ट्वट केले, ‘‘शानदार क्रिकेट कारकिर्दीसाठी मायकल क्लार्कचे अभिनंदन. क्लार्क शानदार कर्णधार असून, आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. क्लार्कला शुभेच्छा.’’
इंग्लंडविरुद्ध २० आॅगस्टपासून खेळल्या जाणाऱ्या पाचव्या व अखेरच्या अ‍ॅशेस कसोटीनंतर क्लार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मालिकेत १-३ ने पिछाडीवर पडल्यानंतर क्लार्कने हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. ३४ वर्षीय क्लार्क कारकिर्दीमध्ये दुखापतींसोबत संघर्ष करीत असल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. नॉटिंघममध्ये चौथा कसोटी सामना संपल्यानंतर क्लार्कने आपला निर्णय जाहीर केला. क्लार्कने कोहलीला टिष्ट्वटरच्या माध्यमातून उत्तर देताना धन्यवाद म्हटले.(वृत्तसंस्था)

Web Title: Kylie congratulated Clark