कुमार संगकाराचा ‘बीसीसीआय’तर्फे सन्मान

By Admin | Updated: August 20, 2015 23:34 IST2015-08-20T23:34:50+5:302015-08-20T23:34:50+5:30

लंकेचा महान कसोटी फलंदाज कुमार संगकारा याचा बीसीसीआयने गुरुवारी दुसऱ्या कसोटीच्या आधी सन्मान केला. बीसीसीआय सचिव अनुराग

Kumar Sangakkara's 'BCCI' honors | कुमार संगकाराचा ‘बीसीसीआय’तर्फे सन्मान

कुमार संगकाराचा ‘बीसीसीआय’तर्फे सन्मान

कोलंबो : लंकेचा महान कसोटी फलंदाज कुमार संगकारा याचा बीसीसीआयने गुरुवारी दुसऱ्या कसोटीच्या आधी सन्मान केला. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी संगकाराला सन्मानित केल्यानंतर मैदान आणि मैदानाबाहेर सभ्य वर्तनासाठी संगकारा सदैव नव्या खेळाडूंसाठी आदर्श राहील, या
शब्दांत या महान खेळाडूचा गौरव केला.
बोर्ड अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनीदेखील संगकाराचे अभिनंदन केले. संगकाराने १५ वर्षांच्या करिअरमध्ये ३६ शतकांसह १२,३५० कसोटी धावा केल्या. याशिवाय ४०४ वनडेत २५ शतकांसह १४,२३४ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Kumar Sangakkara's 'BCCI' honors