कोलकाताचं गुजरातसमोर 159 धावांचं लक्ष्य
By Admin | Updated: May 8, 2016 22:05 IST2016-05-08T21:48:13+5:302016-05-08T22:05:01+5:30
कोलकाता नाइट रायडर्सनं घरच्या मैदानावर गुजरात लायन्ससमोर 159 धावांचं लक्ष्य

कोलकाताचं गुजरातसमोर 159 धावांचं लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 8- कोलकाता नाइट रायडर्सनं घरच्या मैदानावर गुजरात लायन्ससमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. निर्धारित 20 षटकांत कोलकातानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा केल्यात. उथप्पानं भेदक फलंदाजीच्या जोरावर 10 चेंडूंत 3 चौकार खेचत 14 धावा काढल्यात. तर हसननं नाबाद खेळी करत 4 चौकार आणि 4 षटकार लगावत अर्धशतक झळकावत 64 धावा केल्यात. पठाणनंही नाबाद राहत 41 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार खेचत अर्धशतकासह 63 धावा केल्यात. गंभीर 5, यादवनं 4 धावा केल्यात. पांडे भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. गुजरात लायन्सनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोलकातानं दिलेलं टार्गेट मोडण्याचं गुजरात लायन्ससमोर आव्हान आहे. गुजरात लायन्सच्या पी कुमारनं गोलंदाजीच्या जोरावर गंभीर आणि पांड्ये यांचा अनुक्रमे बळी घेतला. तर कुलकर्णी आणि स्मिथनंही प्रत्येकी एक बळी घेऊन कोलकाताला 158 धावांवरच रोखलं आहे. रसेल, हॉंगॉग, चावला, मॉर्केल आणि यादवला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.