पुणे संघाविरुद्ध कोलकाताचे पारडे जड
By Admin | Updated: November 7, 2014 01:58 IST2014-11-07T01:58:37+5:302014-11-07T01:58:37+5:30
सुपरलीगमध्ये उद्या होणा-या सामन्यात पुणेविरुद्धच्या लढतीत एटलेटिको डी कोलकाता संघाचे पारडे जड असेल.

पुणे संघाविरुद्ध कोलकाताचे पारडे जड
कोलकाता : चमत्कारिक फॉरवर्ड फिकरू टेफेरा आणि प्रशिक्षक एंटोनियो लोपेज हबास यांच्या उपस्थितीने इंडियन सुपरलीगमध्ये उद्या होणा-या सामन्यात पुणेविरुद्धच्या लढतीत एटलेटिको डी कोलकाता संघाचे पारडे जड असेल.
एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने पुराव्याअभावी हबासवरील बंदी दोन सामन्यांपुरतीच ठेवली
आहे. त्यामुळे स्पेनचा हा दिग्गज प्रशिक्षक उद्या मैदानावर उपलब्ध असेल. त्याशिवाय इथिओपियाचा फॉरवर्ड फिकरूदेखील उद्या खेळणार असल्यामुळे कोलकाता संघ
आणखी मजबूत झाला आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत एटीकेने ४ संभाव्य गुण गमावले आहे. मैदानावर फिकरू आणि मैदानाबाहेर हबास यांच्या व्यूहरचनेचा फटका या संघाला बसला होता.
एटीके लुई गर्सियाच्या गोलच्या बळावर ते चेन्नईविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते; परंतु किंगसुक देबनाथच्या चेन्नई बॉक्सच्या आत अनावश्यक अडथळा आणल्यामुळे संघाला ३ गुण गमवावे लागले.
एटीके अजूनही चेन्नईयन एफसी संघाच्या २ गुणांनी पुढे आहे; परंतु त्यांना अजून दोन सामने खेळणे बाकी आहे. त्यामुळे एटीके संघाच्या नंबर वनवर धोका कायम आहे. अशा परिस्थितीत ते घरच्या मैदानावर ३ गुण प्राप्त करण्यासाठी कोणतीही उणीव बाकी ठेवणार नाहीत.
दुसरीकडे, पुण्याचे ५ सामन्यांत
७ गुण आहेत आणि ते पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या ३ सामन्यांत त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. नायजेरियन डुडू ओमगाबेमीच्या मैदानावर खेळण्याच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून पुणे एटीकेला अडचणीत टाकू शकते. (वृत्तसंस्था)