कोलकाताचे बेंगळुरूपुढे १८४ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 16, 2016 21:50 IST2016-05-16T21:50:11+5:302016-05-16T21:50:11+5:30
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला आहे.

कोलकाताचे बेंगळुरूपुढे १८४ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १६ - इंडियन प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेला माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाने आज खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरला स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी १८४ धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. केकेआर कडून कर्णधार गौतम गंभारने ३४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे मनिष पांडे यांने आपला झंझावत दाखवताना ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा झळकावल्या. केकेआर २०० धावांचा टप्पा पार करणार असे वाटत असतानाच मोक्याच्या वेळी फलंदाजांनी आपल्या विकेट गांदाजांना बहाल केल्यामुळे १८३ धावापर्यंतच मजल मारता आली. अष्टपैलू रसेलने हाणामारीच्या षटकात १९ चेंडूत ३ गगनचुंबी षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३९ धावांचे म्हत्वपुर्ण योगदान दिले. उथप्पा २, पठाण ६ आणि सुर्यकुमार ५ यांना आपल्या लौक्कास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. शकिबने ११ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून एस. अरविंद २ आणि इक्बाल अब्दुला , चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.