दिल्लीचे कोलकातासमोर १४७ धावांचं आव्हान
By Admin | Updated: April 20, 2015 21:39 IST2015-04-20T21:39:00+5:302015-04-20T21:39:00+5:30
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीला केवळ १४६ धावाच करता आल्या.

दिल्लीचे कोलकातासमोर १४७ धावांचं आव्हान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीला केवळ १४६ धावाच करता आल्या.
टॉस जिंकल्यानंतर कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल अवघ्या एका धावेवर बाद झाला. श्रेयस अय्यर ३५, जेपी डयूमिनी ५, तिवारी ३२, युवराज सिंग २१, मॅथ्यूज २८, कल्टर नील २ आणि मिश्राच्या एका धावाच्या जोरावर दिल्लीने ८ बाद १४६ धावा केल्या. कोलकाताच्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांच्या मोठया फटक्यावर नियत्रंण मिळविण्यात यश आले. कोलकाताकडून उमेश यादव, मोर्केल आणि पियूश चावलाला प्रत्येकी २-२ गडी बाद करता आले तर नरीनला एक विकेट मिळवता आली