कोलकाता नाइट रायडर्सची विजयी हॅट्ट्रिक
By Admin | Updated: September 25, 2014 04:00 IST2014-09-25T04:00:31+5:302014-09-25T04:00:31+5:30
केकेआरचा हा सलग तिसरा विजय ठरला. केकेआरने विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य गाठताना १५ व्या षटकांत ८७ धावांत ५ गडी गमावताच संकट उभे ठाकले होते.

कोलकाता नाइट रायडर्सची विजयी हॅट्ट्रिक
हैदराबाद : सुनील नरेन आणि कुलदीप यादवच्या जादुई फिरकीपाठोपाठ सूर्यकुमार यादवच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात ‘अ’ गटात आॅस्ट्रेलियाच्या पर्थ स्कोरचर्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला. केकेआरचा हा सलग तिसरा विजय ठरला. केकेआरने विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य गाठताना १५ व्या षटकांत ८७ धावांत ५ गडी गमावताच संकट उभे ठाकले होते. पण सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत चार षटकार आणि एका चौकारासह नाबाद ४३ धावा करताच तीन गडी राखून केकेआरचा विजय साकार झाला. स्कोरचर्सकडून अॅडम व्होजेसने नाबाद ७१, क्रेग सिमन्सने ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
धावफलक : पर्थ स्कोरचर्स - ७ बाद १५१ धावा ( अॅडम व्होजेस नाबाद ७१, क्रेग सिमन्स ३९, सॅम व्हाईटमन २१; कुलदीप यादव २४-३, सुनील नरेन ३१-४) पराभूत विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - ७ बाद १५३ धावा ( रॉबिन उथप्पा २३, गौतम गंभीर २, मनीष पांडे २४, युसूफ पठाण २१, सूर्यकुमार यादव नाबाद ४३, बेहरेनडोर्फ २८-१, पेरिस १९-१, कोल्टर ४१-२, अराफात ३९-४. (वृत्तसंस्था)