कोलकाता नाइट रायडर्सचे २० षटकांत सात गडी बाद १७१ धावा
By Admin | Updated: May 7, 2015 21:47 IST2015-05-07T21:46:33+5:302015-05-07T21:47:56+5:30
सात गडी बाद करत दिल्ली डेअरव्हिल्सने कोलकाता नाइटरायडर्सला १७१ धावांवर रोखले आहे. अमित मिश्रानी चार षटकांत वीस धावा देत एक गडी बाद केला.

कोलकाता नाइट रायडर्सचे २० षटकांत सात गडी बाद १७१ धावा
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ७ - सात गडी बाद करत दिल्ली डेअरव्हिल्सने कोलकाता नाइटरायडर्सला १७१ धावांवर रोखले आहे.
अमित मिश्रानी चार षटकांत वीस धावा देत एक गडी बाद केला. तर युसुफ पठाण ची फलंदाजी केकेआरमध्ये सर्वाधिक उत्तम होती. युसुफ पठाणने २४ चेंडूत तीन चौकार व तीन षटकार लगावत ४२ धावा केल्या. तर मनीष पांडे व पियुष चावला दोघेही २२ धावांवर बाद झाले. सलामी वीर रॉबिन उथ्थप्पा कडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या परंतू, अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पायचित झाल्याने त्याला ३२ धावांवर तंबूत परतावे लागले. दिल्ली डेअरव्हिल्सच्या गोलंदाजांपैकी इम्रान ताहीरने दोन गडी बाद केले, तर झहीर खान मोर्केल व मिश्राने प्रत्येकी एक एक गडी बाद केला.