कोलकाताची चेन्नईयनवर मात
By Admin | Updated: October 4, 2015 04:09 IST2015-10-04T04:09:22+5:302015-10-04T04:09:22+5:30
पोर्तुगालचा फॉरवर्डपटू हेल्डर पोस्टिगा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेतील दुसऱ्या सत्राचा शानदार प्रारंभ केला.

कोलकाताची चेन्नईयनवर मात
चेन्नई : पोर्तुगालचा फॉरवर्डपटू हेल्डर पोस्टिगा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेतील दुसऱ्या सत्राचा शानदार प्रारंभ केला. त्यांनी पहिल्या सामन्यात चेन्नईयन एफसी संघाचा ३-२ गोलने पराभव केला.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी शानदार प्रदर्शन केले. पोर्तुगालचा फॉरवर्डपटू पोस्टिगा याने १३ व्या आणि ७० व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर तिसरा गोल वालमिरो लोपेस रोचा याने ७६ व्या मिनिटाला नोंदवला. चेन्नईयन एफसीकडून जेजे लालपेखलुआने ३१ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता, तर दुसरा गोल ब्राझीलच्या इलानो ब्लमरने ८९ व्या मिनिटाला नोंदवला. तत्पूर्वी स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. ४५ मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्गज अभिनेता रजनीकांत, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, मुकेश अंबानी यांच्यासह आदी कलाकार उपस्थित होते.