कोलकाता १६ धावांनी पराभूत
By Admin | Updated: April 22, 2015 20:33 IST2015-04-22T20:33:02+5:302015-04-22T20:33:02+5:30
सनरायझर्स हैदराबादविरुध्द खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सला ढिसाळ फलंदाजी केल्यानं १६ धावाने पराभव स्वीकारावा लागला.

कोलकाता १६ धावांनी पराभूत
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टण, दि. २२ - सनरायझर्स हैदराबादविरुध्द खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सला ढिसाळ फलंदाजी केल्यानं १६ धावाने पराभव स्वीकारावा लागला.
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरणार तोच पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. पावसामुळे षटकाची संख्या कमी करण्यात आली होती. कोलकाताला १२ षटकात ११७ धावा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. परंतू या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलाकाताच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. रॉबीन उथप्पा ३४, गौतम गंभीर ४, मनीष पांडे ३३, रसेल १९, युसूफ पठाणनच्या ६ धावांच्या जोरावर कोलकाताला ४ बाद १०१ धावाच करता आल्या.