आयसीसी टी-20 क्रमवारीत कोहलीच 'एक नंबर'
By Admin | Updated: September 11, 2016 14:01 IST2016-09-11T14:01:50+5:302016-09-11T14:01:50+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-20ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून भारताच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे

आयसीसी टी-20 क्रमवारीत कोहलीच 'एक नंबर'
-ऑनलाइन लोकमत
दुबई, दि.11- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-20ची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून भारताच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे. टी-20 च्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने (763) तिसरे स्थान मिळवले आहे.
आयसीसी क्रमवारीत 820 रेटींग मिळवत विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले असून 771 रेटिंगसह ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसीने जारी केलेल्या टॉप 10 फलंदाजांमध्ये विराटशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला स्थान मिळवता आलेले नाही.
तर, टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री 743 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह (735) आणि फिरकीपटू आर.अश्विन (684) अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने 740 रॅकिंगसह दुसरे स्थान पटकावले आहे.