कोहलीचे शानदार शतक, भारताला जिंकण्यासाठी ८८ धावांची गरज

By Admin | Updated: December 13, 2014 12:37 IST2014-12-13T09:09:12+5:302014-12-13T12:37:41+5:30

मुरली विजय व विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताला जिंकण्यासाठी अवघ्या ८८ धावांची गरज आहे. भारताने ५ गडी गमावत २७९ धावा केल्या आहेत

Kohli's magnificent century, India need 88 runs to win | कोहलीचे शानदार शतक, भारताला जिंकण्यासाठी ८८ धावांची गरज

कोहलीचे शानदार शतक, भारताला जिंकण्यासाठी ८८ धावांची गरज

 ऑनलाइन लोकमत

अॅडलेड, दि. १३ -  मुरली विजय  व विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताला जिंकण्यासाठी अवघ्या ८८ धावांची गरज आहे. भारताने ५ गडी गमावत २७९ धावा केल्या आहेत. अॅडलेडवरील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी एकूण ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते.धवन (९) व पुजारा (२१) पटापट बाद झाल्यानंतर मुरली विजय (९९) व विराट कोहली (नाबाद १२७) यांची जोडीजमली. त्यांनी शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावावंर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानंतर आलेला रहाणे शून्यावर तर रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला. सध्या कोहली व सहा (०) खेळत असून भारताला जिंकण्यासाठी आणखी ८८ धावांची गरज आहे. 

ऑस्ट्रेलियातर्फे लिऑनने ४ तर जॉन्सनने १ बळी टिपला.

 

 

Web Title: Kohli's magnificent century, India need 88 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.