कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज : वासिम आक्रम

By Admin | Updated: March 11, 2016 23:38 IST2016-03-11T23:38:04+5:302016-03-11T23:38:04+5:30

आक्रमक फलंदाज विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे मत पाकचा माजी कर्णधार वासिम आक्रमने व्यक्त केले.

Kohli is the world's best batsman: Wasim Akram | कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज : वासिम आक्रम

कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज : वासिम आक्रम

लाहोर : आक्रमक फलंदाज विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे मत पाकचा माजी कर्णधार वासिम आक्रमने व्यक्त केले.
भारतीय संघाचा खेळ चांगला होत असून, त्यात विराटचे मोठे योगदान आहे. विराटच सध्याचा सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जर माझ्या काळातही तो खेळत असला असता तरीदेखील त्याला रोखणे अवघडच असले असते, असे अक्रम म्हणाला. कसोटी, एकदिवसीय व टी-टष्ट्वेन्टी या तिनही प्रकारांत तांत्रिकदृष्ट्या त्याची फलंदाजी सक्षम आहे. परिस्थितीनुसार फंलदाजी करण्याचे कौशल्य कोहलीमध्ये असल्याचेही तो म्हणाला.
आशियाई चषक स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Kohli is the world's best batsman: Wasim Akram